नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीविषयी आपले मत दिले आहे. एक धोकादायक फलंदाज म्हणून विराट कोहली उदयास आला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षात तो सणकी (brat) होता, असे अख्तरने सांगितले.
अख्तर म्हणाला, "विराट कोहली आता वेगळ्या स्तरावर पोहोचला आहे, पण कोहली ब्रँडच्या मागे कोण आहे? २०१०, २०११ मध्ये कोहली कोठेही दिसत नव्हता. तो माझ्यासारखा एक सणकी (brat) होता. अचानक व्यवस्थेने त्याला खूप पाठिंबा दर्शवला. व्यवस्थापनाने त्याच्यावर काम केले. त्यालाही समजले, की त्यांचा मान-सन्मान पणाला लागला आहे."