कराची - २१ व्या शतकातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून शोएब अख्तरची ओळख आहे. अख्तरने २०११ च्या विश्वचषकानंतर क्रिकेटला रामराम ठोकला होता. रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएबचे वय आता ४३ वर्षे आहे. तो क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा धावणार अशी घोषणा त्याने त्याच्या टि्वटरवरून केली आहे.
सावधान! रावळपिंडी एक्सप्रेस पुन्हा मैदानावर धावणार - क्रिकेट
शोएब १४ तारखेला मैदानात उतरणार आहे. तो कोणत्या लीगकडून खेळणार हे अद्याप त्याने स्पष्ट केले नाही.
शोएब मैदानात पुन्हा उतरणार ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आनंददायी आहे. या व्हिडिओत तो बोलताना म्हणाला, की आजकालचे गोलंदाज हे वेगवान वाटत नाही. तो पुन्हा एकदा जगातील युवा खेळाडूंना वेग काय असतो हे दाखून देणार आहे. जे आजच्या खेळाडूंना करावे लागते ते आजकालचे गोलंदाज करत नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
शोएब १४ तारखेला मैदानात उतरणार आहे. तो कोणत्या लीगकडून खेळणार हे अद्याप त्याने स्पष्ट केले नाही. शोएब पाकिस्तानकडून ४६ कसोटी आणि १६३ एकदिवसीय आणि १५ टी-२० खेळला आहे. त्यात त्याने अनुक्रमे १७८, २४७, आणि १९ गडी बाद केले आहे.