चेन्नई- वेस्ट इंडीजचा फलंदाज शिमरन हेटमायने शानदार शतक झळकावत भारतासमोर आव्हान उभे केले आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयासाठी चांगलेच झुंझावे लागणार असल्याचे चित्र आहे. भारताने दिलेल्या २८८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे. ३३ षटकात वेस्ट इंडीजने केवळ १ गड्याच्या मोबदल्यात १७८ धावा केल्या आहेत.
शिमरन हेटमायरचे शानदार शतक; भारताची विजयासाठी झुंज - India vs West Indies 1st ODI
वेस्ट इंडीजचा फलंदाज शिमरन हेटमायरने शानदार शतक झळकावले.
हेटमायरने (१०७) शानदार शतक झळकावले, त्याला यष्टीरक्षक शाही होपने (६४) अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. हेटमायर आणि होप अजून नाबाद खेळत असल्याने भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी तरसावे लागत आहे. संघाच्या ११ धावा झाल्या असताना पहिला गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर हेटमायर आणि होपने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. दुसऱ्या विकेटसाठी आत्तापर्यंत दोघांनी १८१ भागिदारी केली आहे.
भारताकडून दीपक चहर केवळ १ गडी बाद करण्यात यश मिळाले आहे. वेस्ट इंडीजला सध्या ८४ चेंडूत ८४ धावांची आवश्यकता आहे.