मेलबर्न - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० मालिकेला मुकला होता. त्यामुळे धवन सध्या आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. दरम्यान, त्याने सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये हजेरी लावली.
हेही वाचा -४ फेब्रुवारीला रंगणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना!
शुक्रवारी धवन आपली पत्नी आयशा मुखर्जीसोबत या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी दाखल झाला. त्याने डोमिनिक थीम आणि अलेक्झांडर ज्वेरेव यांच्यात झालेला सामना पाहिला. आयशाने धवनसोबतचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 'ऑस्ट्रेलियन ओपनचा आनंद घेत आहे', असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. थीमने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश नोंदवला आहे. तब्बल ३ तास ४२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात थीमने ज्वेरेवला ३-६, ६-६, ७-६(७-३), ७-६(७-४) असे हरवले.