बंगळुरु - भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला खेळण्यासाठी संधी मिळाली नाही. त्याच्या जागी के.एल राहुलला संधी देण्यात आली. तरीही त्याला ट्रोल केले जात आहे.
टीम इंडियाचा गब्बर सोशल मीडियावर होतोय ट्रोल - ट्रोल
पहिल्या टी20 सामन्याच्या आधी शिखरने त्याचा सरावानंतरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते की, उद्यासाठी सर्व तयारी झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र, त्याला या सामन्यात ११ जणांमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला सामन्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये १२ वा खेळाडू म्हणून बसावे लागले.
![टीम इंडियाचा गब्बर सोशल मीडियावर होतोय ट्रोल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2558239-748-21e2f84a-bfde-4c34-a64b-28f3fdfeba79.jpg)
पहिल्या टी20 सामन्याच्या आधी शिखरने त्याचा सरावानंतरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते की, उद्यासाठी सर्व तयारी झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र, त्याला या सामन्यात ११ जणांमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला सामन्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये १२ वा खेळाडू म्हणून बसावे लागले.
भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना धोनीने फलंदाजी करत असताना त्याने बॅट बदलण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे इशारा केला. त्यानंतर धवन बॅट घेऊन मैदानात धावत आला. धवनचा बॅट घेऊन मैदानात येतानाचा हा फोटो आणि त्याने सामन्याच्या आदल्यादिवशी पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक गमतीशीर कमेंट पाहायला मिळत आहेत.