महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानच्या खेळाडूंशी 'पंगा' घेणे माझी आवड, भारतीय फलंदाजाचा खुलासा - भारत पाक बातमी

धवनला पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या विरोधात का ट्विट केले असे विचारले असता, धवनने सांगितले की, 'मला आफ्रिदीचा ट्विट आवडला नाही. म्हणून मी त्याला प्रत्त्युत्तर ट्विटच्या माध्यमातून दिले.'

पाकिस्तानच्या खेळाडूंशी 'पंगा' घेणे माझी आवड, भारतीय फलंदाजाचा खुलासा

By

Published : Sep 28, 2019, 9:46 PM IST

नवी दिल्ली - मला पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंविरोधात ट्विट करायला आवडते, असा खुलासा भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने केला आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंविरोधात धवनचे ट्विट 'वॉर' अनेकवेळा पाहायला मिळाले आहे. या विषयी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारले असता, धवनने ही माझी 'आवड' बनली असल्याचे सांगितले.

धवनला पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या विरोधात का ट्विट केले असे विचारले असता, धवनने सांगितले की, 'मला आफ्रिदीचा ट्विट आवडले नाही. म्हणून मी त्याला प्रत्त्युत्तर ट्विटच्या माध्यमातून दिले.'

हेही वाचा -'संघासाठी खडतर निर्णय घेणाऱ्या धोनीला निवृत्ती कधी घ्यायची कळतं'

दरम्यान, आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावरुन ट्विट केले होते. त्यात त्याने, काश्मीरमधील स्थिती गंभीर असून संयुक्त राष्ट्र काय काम करत आहे, असा सवाल केला होता. यावर धवनने 'तु, पहिले तुझ्या देशाची परिस्थिती सुधार. आमचं आम्ही पाहून घेऊ आम्हाला माहित आहे, पुढे काय करायचे आहे. तु तुझे विचार तुझ्याजवळ ठेव' असा सल्ला दिला होता.

कार्यक्रमात धवनने दिलखुलास उत्तर देत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने ट्विट सोडून शायरी करणे आवडत असल्याचे सांगितले.

हेही वाचा -इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

ABOUT THE AUTHOR

...view details