मुंबई -पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर, आफ्रिदीवर भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी टीका केली होती. आता यात सलामीवीर फलंदाज शिखर धवननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
''आमचा एकजण सव्वा लाखाच्या बरोबरीचा'', धवनने आफ्रिदीला सुनावले - shikhar dhawan on kashmir news
''सध्या संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत आहे आणि तुला काश्मीरची चिंता आहे. काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहील. तुम्ही 22 कोटी लोकं घेऊन या. आमचा एकजण सव्वा लाखाच्या बरोबरीचा आहे. बाकीचे मोजमाप करून घे'', असे ट्विटरवर धवनने आफ्रिदीला सुनावले आहे. धवनपूर्वी, भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि फिरकीपटू हरभजन सिंगनेही आफ्रिदीला सुनावले.

आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावरुन नरेंद्र मोदी घाबरट माणूस असल्याचे वक्तव्य केले होते. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की, त्या 7 लाख सैनिकांच्या मागे पाकची 22-23 कोटी जनतारुपी सैन्य उभी आहे. आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत, असेही आफ्रिदीने म्हटले होते.