नवी दिल्ली -आयपीएलच्या 12 व्या हंगामात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्ली कॅपिटल्ससाठी काही उत्कृष्ट भागीदारी केल्या आहेत. आयपीएलदरम्यान पृथ्वीने धवनवर चांगलीच छाप पाडलेली दिसत आहे. धवनने पृथ्वीच्या कामगिरीचे कौतुक करत त्याला एक बॅट गिफ्ट म्हणून दिली आहे. या बॅटवर धवनने आपली स्वाक्षरी करुन पृथ्वीसाठी लिहिले आहे की, 'एके दिवशी तु दिग्गज बनशील'.
पृथ्वी शॉला 'या' दिग्गजाने बॅट गिफ्ट करत दिला खास संदेश - gifted
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा पृथ्वीचे कौतुक करताना म्हणाला होता की, मला पृथ्वीच्या फलंदाजीमध्ये सेहवागची झलक दिसते.
पृथ्वी शॉ
दिल्लीकडून खेळताना पृथ्वीने या वर्षी चमकदार कामगिरी केली आहे. धवनशिवाय दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनीही पृथ्वीचे तोंड भरून कौतुक केले आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा पृथ्वीचे कौतुक करताना म्हणाला होता की, मला पृथ्वीच्या फलंदाजीमध्ये सेहवागची झलक दिसते.