नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी घरगुती हिंसाचाराबद्दल खास संदेश दिला आहे. लॉकडाऊन दरम्यान कुटुंबासमवेत वेळ घालवणाऱ्या शिखरने लोकांना स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडून घरगुती हिंसाचाराच्या सामाजिक दुष्कृत्यांचा अंत करण्याची विनंती केली आहे.
घरगुती हिंसाचाराबद्दल शिखर धवनने दिला खास संदेश दिला - shikhar dhawan latest twitter video news
“जेव्हा मी माझ्या प्रेमळ कुटुंबासमवेत घरी वेळ घालवत आहे, तेव्हा घरगुती हिंसाचाराबद्दल ऐकून मी फार निराश आणि दुः खी झालो. आपल्या समाजात आजही ही गोष्ट अस्तित्वात आहे. याचा अंत होण्याची गरज आहे. एक प्रेमळ जोडीदार निवडा. हिंसाचाराला नको म्हणा”, असे शिखरने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले.

व्हिडिओमध्ये शिखर पत्नी आयशा आणि मुलासह वर्कआउट करताना दिसत आहे. हे सर्वजण बॉक्सिंग ग्लोव्हज घालून एकमेकांशी बॉक्सिंगचा सराव करताना दिसतात. कोरोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्यामुळे अनेकजण आपला वेळ कुटुंबीयासमवेत घालवत आहेत.