मुंबई - सध्या सोशल मीडियावर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची भूरळ सेलिब्रिटींसह आता खेळांडूना पडत आहे. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. यामध्ये आता खेळांडूचीही भर पडत आहे. युवराज सिंगनेही हे चॅलेंज पूर्ण केलं, त्यानंतर युवराजने सचिन तेंडुलकर, शिखर धवन, ख्रिस गेल आणि ब्रायन लारा यांना ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करण्याचे आव्हान आपल्या ट्विटर अकाऊटद्वारे केले आहे.
शिखर धवनने पूर्ण केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’, पाहा व्हिडिओ - mumbai
युवराज सिंगनेही हे चॅलेंज पूर्ण केलं, त्यानंतर युवराजने सचिन तेंडुलकर, शिखर धवन, ख्रिस गेल आणि ब्रायन लारा यांना ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करण्याचे आव्हान आपल्या ट्विटर अकाऊटद्वारे केले आहे.
शिखर धवन
युवराजने दिलेल्या ‘बॉटल कॅप चॅलेंज'च्या आव्हानचा स्वीकार करत शिखर धवनने हे आव्हान पूर्ण केले. त्याने बॅटने चेंडू मारून बॉटलचे टोपन उडवले. हा व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊटवर शेअर केला आहे. विश्वचषक २०१९ च्या दुखापतीनंतर शिखर पहिल्यांदाच नेटमध्ये सराव करताना दिसला.