महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडिया आणि कॅरेबियन खेळाडूंचे 'ये जिंदगी ना मिलेगी दोबारा'वाले क्षण पाहिलेत का? - धमाल

भारतीय संघाचे खेळाडू वेस्ट इंडीजसोबतच्या होणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी धमाल करताना दिसत आहेत.

टीम इंडिया आणि कॅरेबियन खेळाडूंचे 'ये जिंदगी ना मिलेगी दोबारा'वाले क्षण पाहिलेत का?

By

Published : Aug 13, 2019, 5:14 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन - विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. आता तिसरा आणि अंतिम सामना उद्या (बुधवारी) होणार आहे. या सामन्यापूर्वी, टीम इंडिया आणि विंडीजचे खेळाडू निसर्गाचा आनंद घेताना दिसले.

भारतीय संघाचे खेळाडू वेस्ट इंडीजसोबतच्या होणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी धमाल करताना दिसत आहेत. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या या मस्तीचा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्यासोबत, मयंक अग्रवाल, डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद हे खेळाडूसुद्धा पाण्यात धमाल करताना दिसले.

गब्बरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो आणि मयंक अग्रवाल हे बोटीवरून ‘फ्लिप’ उडी मारताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावलेला श्रेयस अय्यर पारंब्यांना लोंबकाळताना दिसत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत वेस्ट इंडिजचे कायरन पोलार्ड, निकोलस पूरन हे खेळाडू देखील या धमाल मस्तीमध्ये सामिल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details