लंडन -यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल हा प्रमुख आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. विकेट घेतल्यानंतर तो सॅल्ल्यूट करतो. त्याची ही स्टाईल अनेकजण कॉपी करत आहेत. अशाच प्रकारे सध्या एक लहान मुलगा व मुलगी कोट्रेलच्या सॅल्ल्यूट स्टाईलची कॉपी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात शेल्डन कोट्रेलने दोन छोट्या पाहुण्यांना केले आमंत्रित - sallute gesture
आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून खेळताना शेल्डन कॉट्रेलने 9 विकेट घेतल्या आहेत.
![भारताविरुद्धच्या सामन्यात शेल्डन कोट्रेलने दोन छोट्या पाहुण्यांना केले आमंत्रित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3670017-253-3670017-1561552040300.jpg)
भारताविरुद्धच्या सामन्यात शेल्डन कोट्रेलने दोन छोट्या पाहुण्यांना केले आमंत्रित
या शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅपशनमध्ये एका क्रिकेट चाहत्याने या दोघांसाठी कॉट्रेलच्या नावाची जर्सी कुठे मिळेल का? असा प्रश्न विचारला आहे. आणि या प्रश्नाला कॉट्रेलने उत्तर देत 'दोघांनाही भारताविरुद्धची लढत पाहण्याचे आमंत्रण दिले आहे.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून खेळताना शेल्डनकॉट्रेलने 9 विकेट घेतल्या आहेत.