नवी दिल्ली - आयपीएलमधील सर्वात बलाढ्य असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने आपल्या देशातील स्थानिक टी-२० लीग स्पर्धा बीग बॅश लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३७ वर्षीय शेन वॉटसन बीग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स या संघाचे प्रतिनीधीत्व करायचा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०१६ साली निवृत्ती घेणारा वॉटसन बीबीएलमध्ये आतापर्यंत ४ मोसम खेळला आहे. त्याने बीबीएलमध्ये ४२ सामने खेळताना १ हजार ५६ धावा केल्या आहेत. तसेच ४२ विकेटही आपल्या नावावर केले आहेत.