महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनची 'नवी खेळी' सुरू - ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन न्यूज

वॉटसनने ऑस्ट्रेलियाकडून ५९  कसोटी, १९० एकदिवसीय आणि ५८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जबरोबर खेळताना चांगले प्रदर्शन केले होते.

धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनची 'नवी खेळी' सुरू

By

Published : Nov 12, 2019, 5:05 PM IST

सिडनी -ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने आपल्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ केला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या (एसीए) अध्यक्षपदी शेन वॉटसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी रात्री एसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) ही नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा -मिस्ट्री गर्लने शेअर केला दीपक चहरचा 'तो' व्हिडिओ, वाचा कोण आहे 'ती'

'भविष्यात एसीएची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण असल्याने मला एसीएचे अध्यक्ष म्हणून निवडल्याचा अभिमान वाटतो. यापूर्वी ज्या लोकांनी ही भूमिका बजावली होती त्यांचे महत्त्वाचे काम मला पुढे नेले पाहिजे. ही संधी मिळवण्यासाठी मी खूप उत्साही आहे. खेळाने मला खूप काही दिले आहे ते परत देण्यास मला मदत होईल', असे वॉटसनने नियुक्ती झाल्यानंतर म्हटले आहे.

वॉटसनने ऑस्ट्रेलियाकडून ५९ कसोटी, १९० एकदिवसीय आणि ५८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जबरोबर खेळताना चांगले प्रदर्शन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details