महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 6, 2020, 11:46 AM IST

ETV Bharat / sports

स्विंग गोलंदाजीसाठी वॉर्नने सुचवला नवा पर्याय

वॉर्नने सुचवले , की चेंडू एका बाजूने भारी ठेवावा जेणेकरून पॉलिश करण्याची गरज भासू नये. वॉर्नचा असा विश्वास आहे, की यामुळे सपाट खेळपट्टीवरही चेंडू स्विंग करण्यास मदत होईल.

shane warne suggested the use of a heavy ball to gain swing
स्विंग गोलंदाजीसाठी वॉर्नने सुचवला नवा पर्याय

लंडन -ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने स्विंग गोलंदाजीसाठी उपयुक्त अशा चेंडूबाबत पर्याय सुचवला आहे. चेंडूला चमकवण्याच्या जुन्या पद्धती बंद करून वजनाने जड चेंडू वापरण्यात यावा, असे वॉर्नने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर रोखण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करत आहे.

वॉर्नने सुचवले, की चेंडू एका बाजूने भारी ठेवावा जेणेकरून पॉलिश करण्याची गरज भासू नये. वॉर्नचा असा विश्वास आहे, की यामुळे सपाट खेळपट्टीवरही चेंडू स्विंग करण्यास मदत होईल.

तो म्हणाला, "पुढे जाण्याचा हा योग्य मार्ग आहे आणि चेंडूबरोबर छेडछाड करण्याची गरज भासणार नाही. क्रिकेट बॅट्समध्ये वर्षानुवर्षे मोठे बदले झाले, परंतु चेंडूमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.''

ABOUT THE AUTHOR

...view details