मेलबर्न- ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फिरकीपटू शेन वॉर्नने मेलबर्न येथील आपले अलिशान घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नच्या घराचा लिलाव ४ एप्रिल रोजी होणार आहे.
शेन वॉर्नने हे घर २००८ मध्ये अॅस्सेनडन फुटबॉल क्लबचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू लॉयड याच्याकडून ५.४ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४० कोटींना विकत घेतले होते. वॉर्नच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, तो १४५ कसोटीत ७०८ गडी बाद करणारा दिग्गज गोलंदाज आहे. तो नेहमी त्याच्या स्टायलिश राहणीमानामुळे चर्चेत असतो.
दरम्यान, वॉर्नला सेंट किल्डामध्ये एक अलिशान अपार्टमेंट घ्यावयाची आहे. यामुळे तो आपले घर विकत आहे.
कसे आहे वॉर्नचे घर -
वॉर्नच्या घरात अनेक हायटेक सुविधा आहेत. बाथरूम अटॅच पाच बेडरूम, वाईन सेलर, होम थिएटर, स्विमिंग पूल आणि स्पा अशा सर्व सुविधा या घरात आहेत.
वॉर्नने हे घर विकत घेताना जवळपास ४० कोटी रुपये मोजले होते. पण सद्याच्या मार्केट रेटनुसार या घराची किंमत ५१ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. लिलावात या घराला ५५ कोटींपेक्षा अधिक बोली लागू शकते, असा अंदाज आहे.
दरम्यान, याआधी शेन वॉर्नने आपल्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव केला होता. ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीतील पीडितांसाठी त्याने आपली कॅपचा लिलाव केला. तेव्हा त्या कॅपला १० लाख ७ हजार ५०० ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे ४ कोटी ९२ लाख ८ हजार इतकी बोली मिळाली होती.
हेही वाचा -'कोरोनाची भीती वाटते? भिऊ नका क्रिकेट खेळायला आमच्याकडे या'
हेही वाचा -VIDEO : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेहवाग म्हणतोय; हाथ ना लगाइए.. कीजिए इशारा दूर दूर से...