मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नने 'बॅगी ग्रीन' कॅपप्रति अंधश्रद्धा असलेल्यांवर टीका केली आहे. वॉर्न म्हणाला, ''याचा अर्थ असा नाही की मला ऑस्ट्रेलियाकडून खेळणे आवडत नाही. माझे माझ्या देशावरचे प्रेम कमी झालेले नाही.'' 2019च्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये भीषण वणव्याचे लोण सर्वत्र पसरले होते. देशातील विविध राज्यांमध्ये लागलेल्या या आगींमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली. या संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी वॉर्नने 145 कसोटी सामन्यात वापरलेली 'बॅगी ग्रीन' कॅप लिलावात काढली.
शेन वॉर्नने अंधश्रद्धाळू लोकांना फटकारले
2019च्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये भीषण वणव्याचे लोण सर्वत्र पसरले होते. देशातील विविध राज्यांमध्ये लागलेल्या या आगींमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली. या संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी वॉर्नने 145 कसोटी सामन्यात वापरलेली 'बॅगी ग्रीन' कॅप लिलावात काढली. वॉर्नने 'बॅगी ग्रीन' कॅपप्रति अंधश्रद्धा असलेल्यांवर टीका केली आहे.
वॉर्नने सांगितले, “ऑस्ट्रेलियासाठी आपल्याला किती खेळायचे आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ही कॅप घालण्याची गरज नाही. मला ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळायला आवडते. देशासाठी फक्त क्रिकेट खेळण्याचा मला आनंद आहे."
वॉर्न पुढे म्हणाला, "मला नेहमीच असे वाटते, की मी जर एखादी पांढरी सामान्य किंवा माझी बॅगी ग्रीन कॅप घातली असती तर माझ्यासाठी त्याचा एकच अर्थ होता. तो म्हणजे की मी फक्त ऑस्ट्रेलियाकडून खेळत होतो." वॉर्नच्या या कॅपला लिलावात 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी किंमत मिळाली होती.