महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वॉर्नने निवडली भारतीय खेळाडूची आयपीएल इलेव्हन, सचिनचा नाही समावेश - shane warne picks his ipl xi featuring only indians

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू आणि राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्नने, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूची सर्वोत्कृष्ट इलेव्हन निवडली आहे.

shane warne picks his ipl xi featuring only indians
वॉर्नने निवडली भारतीय खेळाडूची आयपीएल इलेव्हन, सचिनचा नाही समावेश

By

Published : Apr 8, 2020, 11:49 AM IST

मुंबर्ई- ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू आणि राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्नने, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूची सर्वोत्कृष्ट इलेव्हन निवडली आहे. धक्कादायक म्हणजे, वॉर्नने त्याच्या संघामध्ये सचिन तेंडुलकर आणि आयपीएलमध्ये जास्त धावा करणाऱ्या सुरेश रैनाला संघात स्थान दिलेले नाही.

वॉर्नने सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवागला पसंती दिली आहे. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहली आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे युवराज सिंह आणि युसूफ पठाणची निवड वॉर्नने केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले आहे. यानंतर त्याने रवींद्र जडेजाची म्हणून अष्टपैलू निवड केली आहे. याशिवाय हरभजन सिंह, सिद्धार्थ, मुनाफ पटेल आणि झहीर खानचा संघात समावेश आहे.

वॉर्नच्या संघात सुरेश रैना, सचिन तेंडुलकरचा समावेश केलेला नाही. रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-५ मध्ये आहे. तर दुसरीकडे वॉर्नने सिद्धार्थ त्रिवेदीची निवड करुन सर्वांना चकित केले आहे. दरम्यान, सिद्धार्थने आयपीएलच्या पहिल्या सत्रात सर्वांना प्रभावित केले होते.

वॉर्नने निवडलेला ऑलटाइम इंडियन आयपीएल इलेव्हन -

  • रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंह, यूसुफ पठाण, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, हरभजन सिंह, झहीर खान, सिद्धार्थ त्रिवेदी आणि मुनाफ पटेल.

हेही वाचा -'हिटमॅन' रोहित म्हणाला.. युवराज माझा क्रश होता

हेही वाचा -कोरोना लढ्यासाठी बटलरच्या जर्सीचा लिलाव; मिळाली 'इतक्या' लाखांची बोली

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details