मुंबई- कोरोनामुळे सद्या क्रीडा विश्वातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या काळात भारतीय क्रिकेट संघाचा माजी मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ रॉब मूडी यांनी, बाद आहे की नाही... सचिन विरुद्ध वॉर्न, असे कॅप्शन देत शेअर केले आहे. मूडी यांच्या ट्विटला वॉर्नने रिट्विट केले आहे.
१९९८ साली ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. या मालिकेतील चेन्नई कसोटी सामन्यातील हा व्हिडिओ आहे. सचिनने या सामन्यात नाबाद १५५ धावांची खेळी केली होती. वॉर्नने सचिन विरोधात पायचितचे अपील केले. तेव्हा पंच व्यंकट यांनी नॉटआऊट असल्याचा निर्णय दिला.