मुंबई - भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला असून त्याने सरावाला सुरूवात केली आहे. शमीने गोलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित तीनही कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली.
शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू होते. शमी आता दुखापतीतून सावरला असून त्याने अकादमीमध्ये सरावाला सुरूवात केली आहे.