ढाका -बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत हातभार लावण्यासाठी आपल्या आवडत्या बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिब फेसबुकवर म्हणाला, "मी आधीच सांगितले होते की मला माझ्या बॅटचा लिलाव करायचा आहे. मी 2019 वर्ल्ड कपमध्ये वापरलेल्या बॅटचा लिलाव करण्याचे ठरवले. ही माझी आवडती बॅट आहे."
विश्वकरंडक-विक्रमवीर शाकिब करणार आपल्या आवडत्या बॅटचा लिलाव - शाकिब करणार आपल्या आवडत्या बॅटचा लिलाव न्यूज
गतवर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये शाकिबने 600 धावा केल्या. वर्ल्डकपच्या कोणत्याही एका आवृत्तीत 600 किंवा अधिक धावा आणि 10 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला होता.

विश्वकरंडक-विक्रमवीर शाकिब करणार आपल्या आवडत्या बॅटचा लिलाव
गतवर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये शाकिबने 600 धावा केल्या. वर्ल्डकपच्या कोणत्याही एका आवृत्तीत 600 किंवा अधिक धावा आणि 10 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला होता.
बॅटचा लिलाव करणारा शाकिब हा दुसरा बांगलादेशी क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमनेही कोरोना पीडितांच्या मदतीसाठी त्याच्या बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.