नवी दिल्ली -बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर कारवाई करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, शाकिबने नुकत्याच एका टेलीकॉम कंपनीसोबत करार केला होता मात्र, बीसीबीअन्वये शाकिब असा कोणताही करार करू शकत नाही.
हेही वाचा -टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज पुन्हा होणार बाप
बीसीबीचे अध्यक्ष नजमुस हसन यांनी या कारवाईची माहिती दिली. ग्रामीणफोन नामक कंपनीशी शाकिबने करार केला होता. 'शाकिबने संबंधित घटनेची संतोषजनक कारणे दिली नाहीत तर, त्याच्यावर कारवाई होऊ शकते. शिवाय आम्ही ग्रामीणफोन कंपनीला भरपाईची नोटीस पाठवली असल्याचे हसन यांनी म्हटले आहे.
बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात प्रथमच संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.