मुंबई- बांगलादेशमध्ये ४८ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून बांगलादेश लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबांच्या मदतीसाठी जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू साकिब अल हसन सरसावला आहे.
बांगलादेशी साकिब सद्या अमेरिकेमध्ये असून तो एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी आयसोलेट झाला आहे. त्याचे कुटुंबीय अमेरिकेत आहेत, परंतु शकिब एका हॉटेलमध्ये थांबला आहे. एकाच देशात असूनही आपल्या कुटुंबीयांना भेटता येत नसल्याचे दुःख त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन व्यक्त केले होते.
बांगलादेशमध्ये कोरोनाचे ४८ रुग्ण आढळले आहे. यामुळे बांगलादेशच्या सरकारने लॉकडाऊचा निर्णय घेतला. तेव्हा रोजंदारीवर घर चालवणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. यावर ३३ वर्षीय शकिबने बांगलादेशमधील काही गरीब कुटुंबीयांची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शकिब अल हसन फाऊंडेशनने 'Save Bangladesh' ही मोहीम सुरू केली आहे. याची माहिती त्याने फेसबुकवरून दिली.