मुंबई- पाकिस्तान माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन एक जुना व्हिडिओ शेअर करत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अँन्ड्र्यू सायमंडला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहलं की, सर्वात लांब षटकार ठोकणारा कोण होता, हे फक्त मी माझा मित्र सायमंडला दाखवू इच्छित आहे.
आफ्रिदीने पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्याच्या व्हिडिओ शेअर केला आहे. या सामन्यात आफ्रिदीने सायमंडच्या गोलंदाजीवर लांब षटकार ठोकला होता. त्याने हा व्हिडिओ शेअर करत, मी माझा मित्र सायमंडला सर्वात लांब षटकार लगावणारा कोण होता? हे दाखवू इच्छित आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, आफ्रिदी आणि सायमंड दोघेही लांब षटकार लगावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार खेचण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने ५३४ षटकार लगावले आहेत. तर या यादीत आफ्रिदी ४७६ षटकारासह दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तिसऱ्या क्रमाकांवर भारतीय संघाचा रोहित शर्मा असून त्याने ४२३ षटकार खेचले आहेत. सायमंडने १४१ षटकार लगावले आहेत.