कराची - पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. आता एका नव्या व्हिडिओमुळे आफ्रिदी पुन्हा ‘व्हायरल’ होत आहे. लॉकडाऊन दरम्यानच्या या व्हिडिओमध्ये तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘घाबरट’ म्हणताना दिसत आहेत.
“नरेंद्र मोदी घाबरट”, शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त वक्तव्य - Shahid afridi latest news
हा व्हिडिओ फिल्म निर्माता अशोक पंडित यांनी शेअर केला आहे. आफ्रिदी म्हणाला, “कोरोनाचा आजार जगभर पसरला आहे. परंतु त्याहूनही मोठा आजार मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांच्या मनात आणि हृदयात आहे. हा आजार धर्म आहे. ते धर्माबाबत राजकारण करत आहेत आणि आमच्या काश्मिरी भावाबहिणींवर अत्याचार करत आहेत. त्यांना उत्तर द्यावे लागेल.”

आफ्रिदी पुढे म्हणाला, “मोदींनी खूप धाडसी होण्याचा प्रयत्न केला तरी ते घाबरट आहेत. छोट्या काश्मीरसाठी त्यांनी ७ लाख सैन्य जमा केले आहे. पाकिस्तानचे एकूण सैन्य ७ लाख आहे. परंतु त्यांच्या मागे २२-२३ कोटी (पाकिस्तानची लोकसंख्या) सैन्य आहे हे त्यांना ठाऊक नाही.”