मुंबई - पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे लवकरच लग्न होणार आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीसोबत, शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा लग्न करणार आहे. याची माहिती खुद्द शाहिद आफ्रिदीने ट्विट द्वारे दिली.
शाहिन आणि शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा यांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. शाहिनचे वडील अय्याझ खान पाकिस्तानी मीडियाशी बोलताना म्हणाले, 'माझ्या मुलाचा साखरपुडा अक्सा आफ्रिदीशी होणार आहे. अक्सा जेव्हा शिक्षण पूर्ण करेल, तेव्हा दोघं लग्न करतील.'
दुसरीकडे शाहिद आफ्रिदी याने देखील या दोघांचे लग्न होणार असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात शाहिद आफ्रिदीने ट्विट केलं आहे. यात त्याने, दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने माझ्या मुलीचा साखरपूडा होणार असल्याचे म्हटलं आहे.