लाहोर -विंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर करणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानी खेळाडूंच्या जर्सीवर शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा लोगो असेल. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) संघासाठी प्रायोजक शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एका पेय कंपनीचा आणि पीसीबीचा प्रायोजकत्वाचा करार नुकताच संपुष्टात आला आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या जर्सीवर दिसणार 'शाहिद आफ्रिदी फाउंडेशन'चा लोगो - pakistani kits logo news
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने स्वत: याबाबत माहिती दिली. "शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो पाकिस्तानच्या क्रिकेट किटवर छापला जाईल याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. कारण आम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चॅरिटी पार्टनर आहोत. वसीम खानचे आभार आणि पीसीबीच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आमच्या संघाला इंग्लंड दौऱ्यासाठी शुभेच्छा", असे आफ्रिदीने ट्विट केले आहे.
![पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या जर्सीवर दिसणार 'शाहिद आफ्रिदी फाउंडेशन'चा लोगो Shahid afridi foundation logo will be on pakistani kits for england tour](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7968064-243-7968064-1594364108105.jpg)
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने स्वत: याबाबत माहिती दिली. "शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो पाकिस्तानच्या क्रिकेट किटवर छापला जाईल याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. कारण आम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चॅरिटी पार्टनर आहोत. वसीम खानचे आभार आणि पीसीबीच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आमच्या संघाला इंग्लंड दौऱ्यासाठी शुभेच्छा", असे आफ्रिदीने ट्विट केले आहे.
एका अहवालानुसार, पीसीबीने नुकत्याच केलेल्या प्रायोजकतेच्या बोली प्रक्रियेदरम्यान केवळ एका कंपनीने रस दाखवला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना मॅंचेस्टर येथे 5 ते 9 ऑगस्ट, दुसरा सामना एजेस बाऊलमध्ये 13 ते 17 ऑगस्ट आणि तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान साऊथम्प्टन येथे खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळतील.