अॅडलेड - पाकिस्तान संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. अॅडलेड येथील मैदानावर मालिकेतील दुसरा व अंतिम सामना सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र पध्दतीने खेळवण्यात येत असून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या दिवशी १ बाद ३०२ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर १६६ तर लाबुशेन १२६ धावांवर नाबाद आहे. या सामन्यात एक मजेशीर किस्सा घडला.
पहिल्या दिवसाच्या ४२ व्या षटकात पाकिस्तानचा गोलंदाज इफ्तेकार अहमद वॉर्नरसमोर गोलंदाजी करत होता. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरने एक जोरदार फटका मारला. चेंडू सीमारेषेकडे वेगाने जात होता. तेव्हा सीमारेषेवर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी हा क्षेत्ररक्षण करत होता. मात्र, शाहीन हा आपल्याच नादात दिसला. त्याला आलेला चेंडू दिसलाच नाही. परिणामी वॉर्नरनला चौकार मिळाला.