महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वेल डन बॉईज! IPL मध्ये केकेआरच्या विजयाचे शतक; शाहरूखने केलं कौतुक - Shah Rukh Khan

आयपीएलमधील १०० वा विजय झाला. हे आमच्यासाठी चांगले आहे. वेल डन बॉईज.. खरेतर, तुम्ही सर्वच जण खूप चांगले खेळलात, अशा आशयाचे ट्विट शाहरूखने केले आहे.

Shah Rukh Khan comment on Kolkata Knight Riders register 100th win in IPL
वेल डन बॉईज! IPL मध्ये केकेआरच्या विजयाची सेंच्यूरी, शाहरूखने केलं कौतुक

By

Published : Apr 12, 2021, 3:03 PM IST

चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजयी सुरूवात केली. रविवारी पार पडलेल्या सामन्यात कोलकाताने सनरायजर्स हैदराबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. आयपीएलमधील कोलकाताचा हा १०० वा विजय आहे. या सामन्यानंतर कोलकाता संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ट्वीट करत आपल्या संघाचे अभिनंदन करत उत्साह वाढवला.

आयपीएलमधील १०० वा विजय झाला. हे आमच्यासाठी चांगले आहे. वेल डन बॉईज.. खरेतर, तुम्ही सर्वच जण खूप चांगले खेळलात, अशा आशयाचे ट्विट शाहरूखने केले आहे. यात त्याने प्रसिद्ध कृष्णा, दिनेश कार्तिक, नितीश राणा, आंद्रे रसेल, हरभजन सिंग, पॅट कमिन्स, शाकिब अल हसन यांना टॅग केलं आहे. तर राहुलच्या नावाचा हॅशटॅग वापरला आहे.

कोलकाताने नितीश राणा (८०), राहुल त्रिपाठी (५३) आणि दिनेश कार्तिकच्या झटपट २२ धावा याच्या जोरावर १८८ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघाची सुरूवात खराब झाली. त्यांची सलामीवीर जोडी १० धावांतच तंबूत परतली.

तेव्हा जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडे यांनी किल्ला लढवला. दोघांनी सुरूवातीला जम बसेपर्यंत सावध खेळ केला. जम बसल्यानंतर त्यांनी कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी ९२ धावांची भागिदारी केली. ही भागिदारी पॅट कमिन्सने जॉनी बेयरस्टोला (५५) बाद करत फोडली. मनिष पांडे एका बाजूने ६१ धावा काढत नाबाद राहिला. पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेरीस कोलकाताने हा सामना १० धावांनी जिंकला.

हेही वाचा -जेव्हा द्रविड धोनीवर रागावतो, सेहवागने सांगितला पाकिस्तान दौऱ्यातील किस्सा

हेही वाचा -IPL २०२१ : चर्चा तर होणारच! पठ्ठ्याने फोडला पॅट कमिन्सला घाम, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details