नवी दिल्ली - भारतीय महिला क्रिकेट संघाने, मंगळवारी झालेल्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयात १५ वर्षीय शेफाली वर्माने ३३ चेंडूत ४६ धावांची खेळी करत मोलाची भूमिका बजावली. शेफाली ही मूळची हरियाणाची असून तिला क्रिकेटसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे, समोर आले आहे. शेफालीच्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, त्यात त्यांनी शेफाली ही मुलगी असल्याने, तिला क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
शेफालीच्या वडिलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, 'शेफाली ही मुलगी असल्याने हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सर्व क्रिकेट अकॅडमीमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला. पण क्रिकेट खेळायचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शेफालीने मुलासारखी वेशभूषा करून प्रशिक्षण घेतले.'
हेही वाचा - महिला टी-२० : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५१ धावांनी विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी