महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेफालीचा 'कहर' सुरुच, दुसऱ्या टी-२० सामन्यात विडींजच्या गोलंदाजांना धुतलं - शेफाली शर्माचे लागोपाठा दुसरे अर्धशतक

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजचा संघ दीप्ती शर्माच्या भेदक माऱ्यासमोर १०३ धावांवर ढेपाळला. तेव्हा भारतीय सलामीवीर जोडी शेफाली शर्मा आणि स्मृती मानधनाने विडींजच्या गोलंदाजांची पिसे काढली. दोघांनी नाबाद खेळी करत संघाला १०.३ षटकात विजय मिळवून दिला. गोलंदाजीत दीप्ती शर्माने ४ गडी बाद केले. तर शिखा पांडे, राधा यादव, आणि पुजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

शेफालीचा 'कहर' सुरुच, दुसऱ्या टी-२० सामन्यात विडींजच्या गोलंदाजांना धुतलं

By

Published : Nov 11, 2019, 12:47 PM IST

नवी दिल्ली - भारतीय महिला क्रिकेट संघाची १५ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्माने दुसऱ्या सामन्यातही दणकेबाज खेळी केली. तिच्या याच खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दुसऱ्या सामन्यात १० गडी राखून विजय मिळवला. शेफालीने या सामन्यात ३५ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी केली. टी-२० मधील तिच्या प्रभावी खेळीमुळे तिला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजचा संघ दीप्ती शर्माच्या भेदक माऱ्यासमोर १०३ धावांवर ढेपाळला. तेव्हा भारतीय सलामीवीर जोडी शेफाली शर्मा आणि स्मृती मानधनाने विडींजच्या गोलंदाजांची पिसे काढली. दोघांनी नाबाद खेळी करत संघाला १०.३ षटकात विजय मिळवून दिला. गोलंदाजीत दीप्ती शर्माने ४ गडी बाद केले. तर शिखा पांडे, राधा यादव, आणि पुजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

भारत-वेस्ट इंडीज संघामध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने ८४ धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने वेस्ट इंडीजचा १० गडी राखून पराभव केला. भारताने ५ सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा -टीम इंडियाच्या विजयात 'या' पाच खेळाडूंची भूमिका ठरली मोलाची

हेही वाचा -IND VS BAN : टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहरचा 'विश्वविक्रम'

ABOUT THE AUTHOR

...view details