वेलिंग्टन -न्यूझीलंड दौर्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा सातवा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वी, ५३ सदस्यांच्या संघात ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता काल, शुक्रवारी घेतलेल्या चाचणीत अजून एका सदस्याची भर पडली आहे.
न्यूझीलंडच्या नियमांनुसार, विलगीकरणाच्या कालावधीच्या तिसर्या आणि बाराव्या दिवशी चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे. नव्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या खेळाडूला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.