नवी दिल्ली -आयपीएल सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी देवळी गावातून १७ जणांना अटक केली. आज शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यावर सट्टेबाजी सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला. हा सामना शुक्रवारी (९ ऑक्टोबर) रंगला होता.
आयपीएल सट्टेबाजी : दिल्लीतून १७ जणांना अटक - delhi ipl 2020 betting
अटक केलेल्यांवर नेब सराय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोबाइल, टीव्ही सेट, डीटीएच कनेक्शन आणि ८१ हजार रोख रुपये जप्त केले आहेत.
आयपीएल सट्टेबाजी : दिल्लीतून १७ जणांना अटक
अटक केलेल्यांकडून मोबाइल, टीव्ही सेट, डीटीएच कनेक्शन आणि ८१ हजार रोख रुपये जप्त केले आहेत. ''क्रिकेट सामन्यांची नोंद तपासण्याचे आणि सट्टेबाजीच्या दरामध्ये सुधारणा करण्याचे काम तीन जणांवर सोपवण्यात आले होते. तर, इतर वेगवेगळ्या मार्गांनी जुगार आणि सट्टेबाजीत गुंतले होते'', असे दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी या छाप्याप्रकरणी सांगितले आहे.
अटक केलेल्यांवर नेब सराय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.