डुनेडिन - एमी सेथरवेटचे नाबाद शतक आणि एमेलिया केरच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या महिला संघाचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने क्लीन स्वीपची नामुष्की टाळली. दरम्यान, ३ सामन्याची एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना टेमी ब्यूमोंट आणि कर्णधार हिथर नाइटच्या खेळीच्या जोरावर ४७.५ षटकात २२० धावा केल्या. यात ब्यूमोंटने नाबाद ८८ धावांची खेळी केली. तर नाइटने ६० धावांची खेळी साकारली. न्यूझीलंडकडून एमेलियाने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर कर्णधार सोफी डिवाइन हिने २ विकेट घेतल्या. हेली जेसन आणि ब्रुक हालिडे यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.