महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; जाणून घ्या कारण - धोनीची मुलगी झिवा न्यूज

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी एका माथेफिरू चाहत्याने दिली. यामुळे धोनीच्या रांची येथील निवासस्थाना बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Security beefed up at Dhoni farmhouse after trolls send rape threats to 5-year-old Ziva
धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; जाणून घ्या कारण

By

Published : Oct 12, 2020, 11:09 AM IST

दुबई - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी एका माथेफिरू चाहत्याने दिली. यामुळे धोनीच्या रांची येथील निवासस्थाना बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धोनी सध्या युएईमध्ये आयपीएल खेळत आहे. अशात त्याची पत्नी साक्षी आणि पाच वर्षाची झिवा घरी आहेत.

काय आहे प्रकरण -

चेन्नई सुपर किंग्जने, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना गमावला. यानंतर एका युजरने धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी दिली.

या धमकी देणाऱ्या मेसेजवर अनेकांनी तीव्र शब्दात टीका केली होती. दरम्यान, या प्रकरणात एका संशयित आरोपीला पोलिसांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अटक केली लवकरच कच्छ पोलीस आरोपीला रांची पोलिसांकडे सुपुर्द करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कच्छ पोलिसांनी अटक केलेला आरोपी अल्पवयीन आहे.

या सर्व घटनेच्या पार्श्वभूमिवर धोनीच्या रांचीमधील निवासस्थाना बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सामना गमावल्यानंतर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रोल केले जाते ही गोष्ट काही नविन नाही. याआधी देखील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर पत्नी आणि गर्लफ्रेंडला ट्रोल केले गेले होते. यात विराटने खराब कामगिरी केली की अनुष्काला ट्रोल गेले होते.

चेन्नई संघासाठी चाहत्यांनी बनवला खास व्हिडीओ -

चेन्नईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी काही मुलींनी एकत्र येऊन एक व्हिडीओ बनवला आहे. चेन्नईच्या संघाने फॉर्मात यावं, विजय मिळवावा आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी, यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ १ मिनिट ५७ सेंकदाचा असून मुली यात डान्स करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच गाजत आहे. या गाण्यातील त्यांचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -SRH vs RR : राहुल तेवातिया आणि खलील अहमद यांच्यात भांडण, पाहा व्हिडीओ

हेही वाचा -IPL २०२० : दिल्लीला जबर धक्का, ऋषभ पंत दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार

ABOUT THE AUTHOR

...view details