लिंकॉन - भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघांदरम्यान खेळला गेलेला दुसरा चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामना बरोबरीत सुटला. न्यूझीलंडनंतर फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून ४६७ धावा केल्या. यात शुबमन गिल (१३६) आणि अजिंक्य रहाणेने (नाबाद १०१) शतक झळकावले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार हनुमा विहारीने ५९, चेतेश्वर पुजाराने ५३ आणि विजय शंकरने ६६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून नटेलने दोन तर, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर आणि डॅरेल मिशेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघातील दुसरी कसोटी अनिर्णित
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवी संघाने पहिल्या डावात ९ गडी गमावत ३८६ धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून ४६७ धावा केल्या. यात शुबमन गिल (१३६) आणि अजिंक्य रहाणेने (नाबाद १०१) शतक झळकावले.
हेही वाचा -असा गोलंदाज तुम्हाला शोधून सापडणार नाही!...पाहा मजेशीर व्हिडिओ
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवी संघाने पहिल्या डावात ९ गडी गमावत ३८६ धावांवर डाव घोषित केला होता. यजमान संघाकडू डॅरेल मिशेलने २२२ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. ग्लेन फिलिप्सने ६५, डॅन क्लीव्हरने ५३, कर्णधार हॅमीश रूदरफोर्डने ४० आणि टिम सेफर्टने ३० धावा केल्या. भारत 'अ' संघाकडून मोहम्मद सिराज, संदीप वॉरियर, रविचंद्रन अश्विन, आवेश खान यांनी प्रत्येकी दोन तर शाहबाज नदीमने एक गडी बाद केला.