केपटाऊन -दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघांत आज सोमवारी होणारा दुसरा एकदिवसीय सामना पुढे ढकलण्यात आला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) हा निर्णय घेतला. दोन्ही बोर्ड सध्या इंग्लंडकडून होणार्या दोन कोरोना चाचणीच्या निकालाची वाट पाहत आहेत.
दुसरा एकदिवसीय सामना स्थगित हेही वाचा -माझ्याऐवजी नटराजन हा खरा सामनावीर - हार्दिक पांड्या
मंडळाने निवेदनात म्हटले आहे की, एकदा निकाल आला की, सीएसए आणि ईसीबी एकदिवसीय मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांवर चर्चा करेल. तत्पूर्वी, बोलँड पार्क मैदानावरील पहिला एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलमधील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर इंग्लंडच्या खेळाडू आणि व्यवस्थापन विभागाची शनिवारी संध्याकाळी आरटी-पीसीआर चाचणी झाली.
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने पहिला सामना रद्द करण्यात आला. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुन्हा कोरोना चाचणी केली. ज्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.