जमैका - वेस्ट इंडीज संघाचे दोन माजी कर्णधार ख्रिस गेल आणि रामनरेश सारवान यांच्यात काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. गेलने सारवानला साप म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, सारवान कोरोना व्हायरसपेक्षाही वाईट असल्याचे गेलने सांगितले आहे.
''तू कोरोनापेक्षा वाईट'', माजी कर्णधारावर ख्रिस गेलचा गंभीर आरोप - chris gayle video on sarwan news
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील जमैका तालावाझने गेलला संघात कायम राखलेले नाही. याला सारवान कारणीभूत असल्याचे गेलने म्हटले. एका व्हिडिओमध्ये गेल म्हणाला, ''सारवाननला फ्रेंचायझीवर नियंत्रण हवे आहे. त्यामुळे त्याने मला संघातून बाहेर काढण्याचा कट रचला.''

तो पुढे म्हणाला, ''सारवान तू कोरोना व्हायरसपेक्षा वाईट आहेस. संघामध्ये जे घडले त्यामध्ये तू मोठी भूमिका बजावलीस. कारण तू बॉसच्या अगदी जवळचा आहे. सारवान तू एक साप, सूडबुद्धी आणि खूप अपरिपक्व आहेस. तू अजूनही लोकांच्या पाठीवर वार करतोस. तू कधी बदलशील? युनिव्हर्स बॉसला भेटण्याचा विचारसुद्धा करू नकोस, कारण मी तुला थेट बोलत आहे.''