नॉटिंगहॅम -विश्वकरंडक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे संघ आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी पाकिस्तानने आपल्या अंतिम ११ खेळाडूंची घोषणा केली आहे. यात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद आमिरची निवड करण्यात आली असून, त्याचा हा विश्वकरंडकातील पहिलाच सामना ठरणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आयसीसीने केलेल्या निलंबनामुळे आमिरला २०११ आणि २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेला मुकावे लागले होते.
आमिरने दोन वर्षांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला हरविण्यात आमिरने मोठा वाटा उचलला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमिरने तीन बळी घेत भारताच्या हातून विजय हिसकावून घेतला होता. मात्र त्या सामन्यानंतर आमिरची गोलंदाजी चांगली झाली नाहीय. त्यामुळे आजच्या सामन्याच आमिर कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे.
वेस्ट इंडिजचविरुद्ध असा आहे पाकिस्तानचा संघ
- सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, मोहम्मद आमिर, शादाब खान, आणि वहाब रियाज.