महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रणजी ट्रॉफी : सर्फराज-आकर्षितमुळे मुंबई पहिल्या दिवशी तीनशेपार - मुंबई वि. मध्य प्रदेश रणजी ट्रॉफी न्यूज

सर्फराजशिवाय आकर्षित गोमेलने ११ चौकार आणि एका षटकारासह १२२ धावा केल्या. सलामीवीर गोमेलला मात्र हार्दिक तमोरची साथ लाभली नाही. तामोर १६ धावांवर बाद झाला. सर्फराजने आपल्या खेळीत २२ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

Sarfaraz Khan shines with another hundred for Mumbai againt mp
रणजी ट्रॉफी : सर्फराज-आकर्षितमुळे मुंबई पहिल्या दिवशी तीनशेपार

By

Published : Feb 12, 2020, 9:31 PM IST

मुंबई - वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतील गट-ब सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्फराज खानची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याच्या नाबाद १६९ धावांच्या जोरावर मुंबईने मध्य प्रदेश विरूद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी ४ बाद ३५२ धावा केल्या आहेत. सर्फराजने आपल्या खेळीत २२ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

हेही वाचा -चार मजली उंच इमारतीएवढा रोनाल्डो!

सर्फराजशिवाय आकर्षित गोमेलने ११ चौकार आणि एका षटकारासह १२२ धावा केल्या. सलामीवीर गोमेलला मात्र हार्दिक तमोरची साथ लाभली नाही. तामोर १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने ४३ धावांचे योगदान दिले. सिद्धेश लाड केवळ चार धावा करून तंबूत परतला. त्यानंतर, गोमेल आणि सर्फराज यांनी डावाला आकार दिला. मध्य प्रदेशकडून कुलदीप सेनने तीन गडी बाद केले. शुभम शर्माला एक बळी मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details