नवी दिल्ली - निवड समितीने न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी रविवारी रात्री उशीरा १६ सदस्यीय संघांची घोषणा केली. यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला वगळण्यात आले. तेव्हा नेटिझन्सनी निवड समितीसह बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनची संघात निवड होती. त्याला एकाच सामन्यात अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले. त्या सामन्यात त्याने पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी भारताच्या संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, निवड समितीने संजूला वगळले आहे.
निवड समितीचा संजूला वगळण्याचा निर्णय नेटिझन्सला रुचला नाही. तेव्हा नेटिझन्सनी प्रचंड संताप व्यक्त केला. चार वर्षांनी भारतीय संघात परतलेल्या संजूची, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केवळ दोन चेंडू खेळवून बीसीसीआयने त्याच्या प्रतिभेची चाचपणी केली का, असा सवाल नेटिझन्स करत आहेत.
असा आहे न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर
नेटिझन्सनी केलेले ट्विट्स -