महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

संजू सॅमसनने ठोकले द्विशतक, धोनी धवनसह अनेक दिग्गजांना टाकले मागे - sanju samson

केरळ विरुध्द गोवा यांच्यातील सामन्यात संजूने १२५ चेंडूत २१२ धावांची खेळी केली. संजूने ही खेळी २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने साकारली. महत्वाचे म्हणजे संजू सॅमसनने चक्क १६४.३४ च्या स्ट्राईक रेटने ही वादळी खेळी केली. याआधी कोणत्याच भारतीय खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एवढ्या जलद दुहेरी शतक लगावलेले नाही.

संजू सॅमसनने ठोकले द्विशतक, धोनी धवनसह अनेक दिग्गजांना टाकले मागे

By

Published : Oct 12, 2019, 9:07 PM IST

नवी दिल्ली - विजय हजारे चषक स्पर्धेत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने नाबाद द्विशतकी खेळी केली. केरळसाठी खेळणाऱ्या संजूने गोवा संघाविरोधात धावांचा पाऊस पाडला. दरम्यान, संजूची ही द्विशतकी खेळी प्रथम श्रेणीत सर्वात आक्रमक खेळी ठरली आहे.

केरळ विरुध्द गोवा यांच्यातील सामन्यात संजूने १२५ चेंडूत २१२ धावांची खेळी केली. संजूने ही खेळी २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने साकारली. महत्वाचे म्हणजे संजू सॅमसनने चक्क १६४.३४ च्या स्ट्राईक रेटने ही वादळी खेळी केली. याआधी कोणत्याच भारतीय खेळाडूला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एवढ्या जलद दुहेरी शतक झळकवता आलेले नाही.

संजू सॅमसन

दरम्यान, भारताकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधले हे आठवे द्विशतक आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा (३ वेळा), शिखर धवन, करनवीर कौशल आणि संजू सॅमसनने द्विशतक लगावले आहेत. संजूने २०१५ मध्ये भारताकडून फक्त एकमेव टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर तो अद्याप संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. संजूच्या खेळीने ऋषभ पंतच्या अडचणी वाढल्या असल्याचे, जाणकारांचे म्हणणे आहे.

गोवा विरुध्दच्या सामन्यात केरळचा कर्णधार राॉबिन उथप्पाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा केरळ संघाने निर्धारीत ५० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात ३७७ धावा केल्या. यात संजू सॅमसनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद २१२ धावांची वादळी खेळी केली. तर त्याला सचिने बेबीने १२७ धावा करत चांगली साथ दिली.

हेही वाचा -VIDEO : श्रीलंकेविरुध्दच्या पराभवानंतर चाहत्याने दिला सरफराजच्या पोस्टरला लाथाबुक्यांचा प्रसाद

हेही वाचा -हिटमॅनला भेटण्यासाठी मैदानात घुसला चाहता; झटापटीत जमिनीवर कोसळला रोहित

ABOUT THE AUTHOR

...view details