नवी दिल्ली - विश्वकरंडक स्पर्धेमध्ये महेंद्रसिंह धोनीने संथ खेळी केल्याने त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. या टीकाकारांमध्ये आता भारतीय माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांचीही भर पडली आहे. मांजररेकर यांनी संघ व्यवस्थापनाने धोनीला बॉल फुकट घालवू नको, अशी समज देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच धोनी जितके चेंडू खेळतो, किमान तितक्या धावा तरी धोनीने केल्या पाहिजेत, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
अरे...धोनीला सांगा रे...धावा करायला; भारताच्या दिग्गज माजी खेळाडूचीही टीका - icc world cup 2019
विश्वकरंडक स्पर्धेमध्ये महेंद्रसिंह धोनीने संथ खेळी केल्याने त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. या टीकाकारांमध्ये आता भारतीय माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांचीही भर पडली आहे. मांजररेकर यांनी संघ व्यवस्थापनाने धोनीला बॉल फुकट घालवू नको अशी समज देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच धोनी जितके चेंडू खेळतो, किमान तितक्या धावा तरी धोनीने केल्या पाहिजेत, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
मागील काही सामन्यात संथ खेळी करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला संघ व्यवस्थापनाने प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याची समज द्यावी, त्यानंतर येणारा निकाल पाहावा. एखाद्या सामन्यात संघाची अवस्था २ बाद १२ असेल तर धोनीने खेळलेल्या खेळी मान्य करु. मात्र २० षटकानंतर मैदानात उतरलेल्या खेळाडूने प्रत्येक चेंडूवर धाव काढली पाहिजे, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने अफगाणिस्तान आणि इंग्लडविरुध्दच्या सामन्यात संथ केली. यानंतर धोनी क्रिकेट जाणकारांसह चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.