महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

''रायडू-चावला लो प्रोफाईल क्रिकेटपटू'', मांजरेकर पुन्हा ट्रोल

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलेल्या अंबाती रायडू आणि पीयूष चावलाविषयी मांजरेकरांनी एक ट्विट केले. या दोघांना मांजरेकरांनी 'लो प्रोफाईल क्रिकेटपटू' म्हणून संबोधले. या ट्विटमुळे नेटकरी मांजरेकरांवर संतापले आहेत.

Sanjay Manjrekar faces trolling for calling ambati rayudu and piyush chawla  as a low profile
''रायडू-चावला लो प्रोफाईल क्रिकेटपटू'', मांजरेकर पुन्हा ट्रोल

By

Published : Sep 20, 2020, 6:12 PM IST

Updated : Sep 20, 2020, 6:48 PM IST

मुंबई - यंदाच्या आयपीएलसाठी समालोचकांच्या यादीतून वगळलेले संजय मांजरेकर आपल्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. या वक्तव्यामुळे त्यांना कधीकधी ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. मांजरेकर आता आपल्या नव्या एका ट्विटमुळे जबरदस्त ट्रोल होत आहेत.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलेल्या अंबाती रायडू आणि पीयूष चावलाविषयी मांजरेकरांनी एक ट्विट केले. या दोघांना मांजरेकरांनी 'लो प्रोफाईल क्रिकेटपटू' म्हणून संबोधले. या ट्विटमुळे नेटकरी मांजरेकरांवर संतापले आहेत. आयपीएलच्या तेराव्या पर्वाचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात चेन्नईने मुंबईला ५ गड्यांनी धूळ चारली. दोन बलाढ्य संघामधील सामन्यात चेन्नईचा फलंदाज रायडूने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्याने ७१ धावा तडकावल्या तर, चावलाने रोहित शर्माच्या रूपात यंदाच्या आयपीएलचा पहिला बळी घेतला.

या दोन्ही खेळाडूंचे कौतुक करताना मांजरेकरांनी ट्विटरवर त्यांचा उल्लेख 'लो प्रोफाईल क्रिकेटपटू' असा केला. मांजरेकरांनी चुकीचा शब्द वापरल्याची प्रतिक्रिया सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दिली आहे. याआधी मांजरेकर बऱ्याच वेळा ट्रोल झाले आहेत. रवींद्र जडेजाविषयी केलेल्या ट्विटमुळे त्यांचा चाहत्यांनी खरपूस समाचार घेतला होता. समालोचनादरम्यान भारतीय खेळाडूंवर झालेली टीका आणि हर्षा भोगले यांच्यासोबत रंगलेलं युद्ध यामुळेही मांजरेकर वादात होते.

अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने प्रतिष्ठित टी-२० लीग आयपीएलच्या नव्या हंगामासाठी समालोचकांची यादी (कॉमेंट्री पॅनेल) जाहीर केली आहे. अनुभवी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर, प्रसिद्ध भाष्यकार हर्षा भोगले, आकाश चोप्रा आणि इयान बिशप यांच्यासह अनेक दिग्गजांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, या यादीतून मांजरेकर यांना वगळण्यात आले आहे.

Last Updated : Sep 20, 2020, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details