महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीवर टीका करणारे मांजरेकर ट्रोल; संजयच्या कॉमेट्रीवरुन भडकले चाहते - india vs bangladesh

दरम्यान, काही तासांपूर्वीच संजय मांजरेकर यांनी महेंद्रसिंह धोनी जेवढे चेंडू खेळत आहे. तेवढ्या धावा कराव्या, असा समज बीसीसीआयने धोनीला द्यावा, असे म्हटले होते. या कारणाने मांजरेकर धोनी चाहत्यांच्या रडारवर होते.

धोनीवर टीका करणारे मांजरेकर ट्रोल; संजयच्या कॉमेट्रीवरुन भडकले चाहते

By

Published : Jul 2, 2019, 10:01 PM IST

बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडस स्पर्धेत भारत आणि बांगलादेश या सामन्यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत आहे. संजय मांजरेकर इतके वाईट समालोचक आहेत की चाहते टीव्ही म्यूट करून बघत आहेत. असा प्रकारच्या मजकूर पोस्ट करुन मांजरेकराना चाहत्यांनी धारेवर धरले आहे. तसेच काही चाहत्यांनी मांजरेकर यांना समालोचक म्हणून काढून टाकावं अशी मागणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये संजय मांजरेकर यांचे नाव आले असून चाहते मांजरेकर यांना ट्रोल करत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, या ट्विटमध्ये क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनीही टीका केली आहे. ते म्हणतात, बांगलादेश सामन्यात धोनी बाद झाला तेव्हा प्रतिस्पर्धी संघापेक्षा मांजरेकर यांनाच आनंद जास्त झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, काही तासांपूर्वीच संजय मांजरेकर यांनी महेंद्रसिंह धोनी जेवढे चेंडू खेळत आहे. तेवढ्या धावा कराव्या, असा समज बीसीसीयने धोनीला द्यावा, असे म्हटले होते. या कारणाने मांजरेकर धोनी चाहत्यांच्या रडारवर होते.

काही चाहत्यांनी तर मांजरेकर यांना समालोचक करण्यासाठी बंदी घालावी यासाठी आयसीसीकडे तक्रार केली आहे. त्याने मांजरेकर एखाद्यावर मुद्दाम टीका करतात तर एखाद्याची बाजू घेतात असा आरोप केला आहे. मांजरेकर हे समालोचक करताना चाहते टीव्ही म्यूट केलेली स्क्रीनशॉट चाहत्यांनी पोस्ट केली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details