जमैका - भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर वादात सापडले असून, त्यांनी वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये राष्ट्रीय निवड समितीच्या अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचे, सांगण्यात येत आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर बांगर यांच्या ठिकाणी विक्रम राठोड यांची संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संजय बांगर हे मागील ५ वर्षांपासून भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. आता राष्ट्रीय निवड समितीने संजय बांगर यांच्या ठिकाणी विक्रम राठोड यांची नियुक्ती केली. यामुळे संतप्त बांगर यांनी राष्ट्रीय निवडकर्ता दिबांग गांधी यांच्यावर राग व्यक्त केला. वेस्ट इंडीज दौर्याच्या वेळी हॉटेलच्या खोलीत बांगर यांनी गांधींशी गैरवर्तन करत अर्वाच्च भाषेत खडेबोल सुनावले, असे सांगितले जात आहे.