महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बुमराह पेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे त्याची होणारी पत्नी - जसप्रीत बुमराहची पत्नी न्यूज

बुमराहची होणारी पत्नी संजना, ही बुमराहपेक्षा वयाने मोठी आहे. संजनाचा जन्म ६ मे १९९१ ला पुणे येथे झाला. तर बुमराहचा जन्म हा ६ डिसेंबर १९९३ ला झाला. यावरुन संजना ही बुमराहपेक्षा अडीच वर्षांनी मोठी आहे.

sanjana-ganesan-is-older-than jasprit bumrah
बुमराह पेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे तिची होणारी पत्नी

By

Published : Mar 13, 2021, 3:35 PM IST

Updated : Mar 13, 2021, 4:19 PM IST


मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच क्रीडा अँकर संजना गणेशन हिच्याशी लग्न करणार आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, हा लग्नसोहळा १४ आणि १५ मार्चला होणार आहे. प्रेमात वय, जात, रंग या सारख्या गोष्टींना थारा नसल्याचं म्हटलं जात. बुमराह आणि संजना यांच्या बाबतीत देखील असचं घडलं.

बुमराहची होणारी पत्नी संजना, ही बुमराहपेक्षा वयाने मोठी आहे. संजनाचा जन्म ६ मे १९९१ ला पुणे येथे झाला. तर बुमराहचा जन्म हा ६ डिसेंबर १९९३ ला झाला. यावरुन संजना ही बुमराहपेक्षा अडीच वर्षांनी मोठी आहे.

बुमराह पेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे त्याची होणारी पत्नी

दरम्यान, बुमराहच्या आधी भारतीय क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या मुलीशी लग्न केलं आहे. यात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ, शिखर धवन यांचा समावेश आहे. या यादीत आता बुमराहची भर पडली आहे.

कोण आहे संजना गणेशन -

संजना गणेशनने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलं आहे. यासोबत तिने मॉडेलिंगमध्ये देखील आपले नशिब आजमवलं आहे. तसेच तिनं रिअॅलटी शोमध्ये देखील आपला सहभाग नोंदवला आहे. सद्या ती क्रीडा अँकरीगचे काम करते.

हेही वाचा -WI vs SL, २nd ODI : वेस्ट इंडिजचा श्रीलंकेवर ५ गडी राखून विजय, मालिकेत विजयी आघाडी

हेही वाचा -IPL २०२१ : पंजाब किंग्जची जय्यत तयारी, 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूला केलं प्रशिक्षक

Last Updated : Mar 13, 2021, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details