नवी दिल्ली - पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीने भारतीय सामिया आरजू हिच्याशी २० ऑगस्टला दुबईमध्ये लग्न केले. या लग्नसोहळ्यापूर्वी हसन अलीने फोटोशूट केले होते. लग्नानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक आणि त्याची पत्नी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी आपल्या घरी हसन-सामिया या जोडप्याला डिनर पार्टी दिली. याचा एक फोटो हसन अलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
एकाच फ्रेममध्ये.. दोन पाक क्रिकेटर आणि त्यांच्या भारतीय पत्नी - Shoaib Malik
पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीने भारतीय सामिया आरजू हिच्याशी २० ऑगस्टला दुबईमध्ये लग्न केले. लग्नानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक आणि त्याची पत्नी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी आपल्या घरी हसन-सामिया या जोडप्याला डिनर पार्टी दिली. याचा एक फोटो हसन अलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हसन अलीने दुबईतील एका हॉटेलमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत भारताची सामिया हिच्याशी लग्न केले. या लग्नाआधी सानिया मिर्झाने हसन अली आणि सामिया हिला शुभेच्छा देणारे खोचक ट्विट केले होते.
लग्नानंतर सानिया आणि शोएब या जोडीने नवदाम्पत्य हसन-सामियाला एक पार्टी दिली. या पार्टीचा फोटो हसन अलीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच त्याने सानिया-शोएबचे आभारही मानले आहे. दरम्यान, हसन अलीच्या पूर्वी जहीर अब्बास, मोहसिन खान, शोएब मलिक यांनी भारतीय मुलींसोबत लग्न केले आहे.