महाराष्ट्र

maharashtra

विजय हजारे स्पर्धेत गोलंदाजाचा कारनामा, संघाच्या ७ फंलदाजांना धाडले माघारी

By

Published : Oct 7, 2019, 12:15 PM IST

प्रथम श्रेणीतील संदीपची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याअगोदर, शाबाद नदीम (१० धावांत ८ बळी) आणि आर. संघवी (१५ धावांत ८ बळी) हे गोलंदाज अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. हरियाणाच्या संघाचा खुर्दा उडवताना संदीपने ८ षटकांत १९ धावांत ७ विकेट्स घेतल्या.

विजय हजारे स्पर्धेत गोलंदाजाचा कारनामा, संघाच्या ७ फंलदाजांना धाडले माघारी

नवी दिल्ली -सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने कमाल केली. या स्पर्धेत पंजाबकडून खेळताना त्याने हरियाणाच्या ७ फलंदाजांना १९ धावांत माघारी पाठवले. हरियाणाच्या संघाने या सामन्यात १६.१ षटकांत फक्त ४९ धावा केल्या.

हेही वाचा -'पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे सुरक्षित पैदास केंद्र'

प्रथम श्रेणीतील संदीपची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याअगोदर, शाबाद नदीम (१० धावांत ८ बळी) आणि आर. संघवी (१५ धावांत ८ बळी) हे गोलंदाज अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. हरियाणाच्या संघाचा खुर्दा उडवताना संदीपने ८ षटकांत १९ धावांत ७ विकेट्स घेतल्या. या ८ षटकांमध्ये संदीपने दोन षटके निर्धावही टाकली. हरियाणाकडून नितीन सैनीने २२ आणि सुमित कुमारने १३ धावांची खेळी केली. या फलंदाजांव्यतिरिक्त इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. संदीप शर्माच्या अफलातून गोलंदाजीला सिद्धार्थ कौलनेही साथ दिली. त्याने तीन विकेट्स घेतल्या.

हरियाणाच्या या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची चांगलीच दमछाक झाली. १५.१ षटकांत त्यांना आपले सात फलंदाज गमवावे लागले. पंजाबकडून सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक 22 धावा केल्या. हरियाणाकडून अजित चहलने ४ ,तर हर्षल २ विकेट्स घेतल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details