मुंबई- चार दिवसाच्या कसोटी संकल्पनेविषयी क्रिकेट विश्वातून मान्यवर व्यक्तींकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. यात आणखी एका क्रिकेटरची भर पडली आहे. भारताचे माजी तडाखेबंद फलंदाज संदीप पाटील यांनीही चार दिवसांच्या कसोटीच्या नव्या संकल्पनेला विरोध केला आहे. त्यांनी ही संकल्पना मूर्खपणाची असल्याचे सांगितले.
संदीप पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, सचिन तेंडुलकरनेही कसोटी क्रिकेटची जी समर्पक व्याख्या केली आहे, तेच माझेही म्हणणे आहे. मी जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू आहे. कसोटीतील पहिला दिवस हा वेगवान गोलंदाजांचा असतो आणि कसोटी क्रिकेट यातच त्या क्रिकेट प्रकाराचे वैशिष्ट्य सामावले आहे.'
ते वैशिष्ट्य कसोटीला चार दिवसांवर आणून आपण घालवून टाकणार आहोत का, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, श्रीलंकेचा महेला जयवर्धनने, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यांच्यासह अनेकांनी विरोध दर्शवला आहे.